Halgi Morcha of farmers : घनसावंगीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसीलवर हलगी मोर्चा | Sakal Media<br />घनसावंगी (जि.जालना) : अतिवृष्टीने सडलेला माल बैलगाडीमध्ये भरून हलगी वाजवत संत रामदास महाविद्यालयापासून तहसील कार्यालयावर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हलगी मोर्चा काढून शेतकर्यांच्या मागण्यांवर लक्ष वेधण्यात आले. (Halgi Morcha of farmers in Ghansawangi)घनसावंगी तालुक्यात पावसामुळे मागील महिनाभरापासून पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे गेला. शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. शासनाकडून पंचनाम्यासह कागदीघोडे नाचविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. यामुळे तालुक्यातील युवकांनी युवा शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्याचे ठरविले. त्यासाठी सोशल मीडियांवरून आवाहन करण्यात आले होते. गावागावांत दवंडीद्वारे शेतकर्यांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले. ( व्हिडिओ - सुभाष बिडे)<br />#Jalna #farmer #Ghansawangi #Heavyrain #CropDamage #HalgiMorcha